लग्न ठरल्यानंतर भिती वाटते? मग ‘हे’ वाचा भिती दूर होईल…

    लग्न (marriage) ठरल्यानंतर नवरी असलेल्या मुलीच्या मनात थोडी धाकधूक असणे स्वाभाविक आहे. बरेचसे प्रश्न तिला भेडसावत असतात. जसे की, नवीन घरात ती कसे काय एडजस्ट होऊ शकेल, तिला समजून घेतले जाईल का, नवी नाती सांभाळताना तिला काय काय करावे लागेल अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न नव्या (New question)नवरीच्या मनात येत असतात. त्यामुळे तिचे टेन्शन वाढत असते. अशावेळी कोणाशी बोलावे, कोणाला सांगावे हे कळत नाही. पण काळजी करण्याचे कारण नाही.

    जेव्हा तुमचे लग्न ठरते त्यावेळी तुम्ही तुमच्या सासरकडच्या मंडळींची हळूहळू सगळी माहिती करून घ्यायला सुरुवात करावी. जसे की, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी आणि सासरकडच्या चालीरीती इत्यादी गोष्टी जर तुम्ही जाणून घ्यायला लागलात तर लग्नानंतर तुम्हाला नव्या घरात वावरणे तेवढे कठीण जाणार नाही.

    ही भीती घालवण्यासाठी जेव्हा तुमचे लग्न ठरेल तेव्हा तुम्ही तुमच्या होणाऱ्या पार्टनरकडून तुमच्या सासरच्या मंडळींची सगळी माहिती करून घ्यायला सुरुवात करावी. त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी इत्यादी. तसे केले तर तुम्हाला नव्या घरात वावरणे तेवढे कठीण जाणार नाही.

    त्यांनतर तुमच्या पार्टनरशी मनमोकळेपणाने (Be open with your partner)बोला. तुम्हाला काय वाटते हे त्यांना कळू द्या. तसेच त्यांचेही विचार जाणून घ्या. दोघांनीही एकमेकांकडे आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. लग्नानंतर तुम्हाला एकत्रितपणे आणि समजुतदारपणे संसार करायचा असेल तर एकमेकांना समजून घेणे आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम असणे खूप गरजेचे आहे.

    लग्नानंतर जर एखाद्या कामामध्ये बिघाड झाला तर एकमेकांना दोष देऊ नका. तुम्ही जर एकमेकांचा आदर केला तरच तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींसमोर चांगले उदाहरण ठेऊ शकता.