गुरुवारी करा देवगुरू बृहस्पतीची पूजा, हि पूजा केल्याने तुमच नशीब चमकेल…

  देवगुरु बृहस्पती देवाच्या पूजेत पिवळ्या वस्तू, पिवळी फुले, हरभरा डाळ, मनुके, पिवळी मिठाई, पिवळे तांदूळ आणि हळद आदींचे महत्व आहे. या दिवशी शुद्ध पाण्यात हळद टाकून केळीच्या झाडाला अर्पण करा.

  गुरु पूजेसाठी (Guru Pujan) गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी आपले गुरु आणि देवगुरु बृहस्पती (Brihaspati Dev) यांचे विधिवत पूजन करत उपवास केला जातो. या दिवशी देवगुरु बृहस्पती यांची स्तुती केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मात्र, देवगुरु बृहस्पती यांची पूजा (Brihaspati Dev Pooja Vidhi) कशी करावी हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे गुरुवारी उपवास (Guruvar Vrat) करून देखील अनेकांना इच्छित फळ प्राप्त होत नाही.

  अशी आहे पूजा विधी
  देवगुरु बृहस्पती देवाच्या पूजेत पिवळ्या वस्तू, पिवळी फुले, हरभरा डाळ, मनुके, पिवळी मिठाई, पिवळे तांदूळ आणि हळद आदींचे महत्व आहे. या दिवशी शुद्ध पाण्यात हळद टाकून केळीच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर हरभरा डाळ व मनुके अर्पण करून दिवा लावावा व झाडाची आरती करावी. दिवसातून एकदाच जेवण करावे. जेवणात हरभरा डाळ किंवा पिवळ्या पदार्थाचे सेवन करावे. या दिवशी मिठाचे सेवक करू नये. पूजेवेळी पिवळे वस्त्र परिधान करावे. देवाला पिवळी फळे अर्पण करा आणि स्वतः देखील प्रसाद म्हणून सेवन करा. पूजेनंतर भगवान बृहस्पतीची कथा वाचावी.

  व्रताने देवगुरू होता प्रसन्न
  भगवान बृहस्पतिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तुम्ही त्यांचे व्रत करू शकता. हे व्रत शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू केले जाते. किमान 16 किंवा तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत व्रत ठेवता येते. व्रताच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करा आणि दिवसातून एकदाच जेवण करावे. यासह जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. देवगुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी ‘ओम भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा देखील जप करावा. तसेच शक्य असल्यास पिवळ्या रंगाची फळे भगवान विष्णूला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटावे.

  विष्णु सहस्रनामाचा पाठ करा
  तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल संभ्रम असेल आणि खूप प्रयत्न करूनही तुम्हाला कामात यश मिळत नसेल. तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांनी घेरले असेल तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णु सहस्रनामाचा नियमित पाठ करा. हा उपाय भक्तीभावाने केल्यास अडथळे दूर होत कार्यात यश प्राप्त होईल.