छोट्या बहिणीमुळे वाढू शकते वजन; संशोधकांचा दावा

वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे आपल्याला माहीत असतात. त्यात फास्टफूड खाणे, व्यायाम न करणे, वेळीअवेळी खाणे अशी अनेक कारणे सहभागी असतात. परंतु वजन वाढण्याचे कारण तुमची लहान बहीण आहे, असे कोणी सांगितले तर त्यावर तुमचा जराही विश्वास बसणार नाही. पण हा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे(Younger sister may gain weight).

    वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे आपल्याला माहीत असतात. त्यात फास्टफूड खाणे, व्यायाम न करणे, वेळीअवेळी खाणे अशी अनेक कारणे सहभागी असतात. परंतु वजन वाढण्याचे कारण तुमची लहान बहीण आहे, असे कोणी सांगितले तर त्यावर तुमचा जराही विश्वास बसणार नाही. पण हा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे(Younger sister may gain weight).

    नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, दोन सख्ख्या बहिणीतील मोठ्या बहिणीचे वजन जास्त असते. याला एक वैज्ञानिक कारण आहे. स्वीडिश रिसर्चमध्ये 1991 आणि 2009 मध्ये जन्मलेल्या बहिणीच्या 13 हजार 406 जोडींचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये बघायला मिळाले की, आधी जन्मलेल्या बहिणींमध्ये बीएमआय(बॉडी मास इंडेक्स) अधिक असतो आणि त्यांची लठ्ठ होण्याची शक्यताही अधिक असते.

    या रिसर्चमधून असेही समोर आले की, परिवारात जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीचे वजन आधी जन्माला आलेल्या मुलीच्या तुलनेत कमी होते. पण जसजशा दोघी मोठ्या होत गेल्या त्यांचा बीएमआय 2.4 टक्क्यांनी वाढला. दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे वजन दोघींच्या तुलनेत 29 टक्के अधिक असण्याची शक्यता असते म्हणजे त्यांची लठ्ठ असण्याची शक्यता ही 40 टक्के अधिक असल्याचेही या संशोधनातून समोर आले आहे.

    लहान बहीण असल्यावर मोठ्या बहिणीचे वजन वाढण्यामागे वैज्ञानिक कारणही देण्यात आले आहे. ऑकलँड युनिव्हर्सिटीच्या लिंगिंस संस्थेतील प्राध्यापक वेन कटफील्ड यांच्यानुसार, पहिल्यांदा गर्भधारणा झाल्यावर भ्रूणाला पोषक तत्त्व पुरविणाऱ्या ब्लड वेसेल्स थोड्या पातळ असतात. याने पोषत तत्त्वांची पूर्तता कमी होते. यामुळे अधिक जमा होण्याचा आणि इन्सुलिनचा धोका असतो. याचा प्रभाव नंतर जीवनावर बघायला मिळतो.

    या सिद्धांतानुसार, न्यूयॉर्कच्या लेनॉक्स हिल हॉस्पिटलच्या सेंटर फॉर वेट मॅनेजमेंटच्या निर्देशिका डॉ. मारिया पेना यांनीही त्यांचा तर्क सांगितला. त्या म्हणाल्या की, माता त्यांच्या पहिल्या बाळाच्या हेल्थबाबत फार सजग असतात. अशात त्या बाळांना अधिक स्तनपान करवतात. लहान मुलांमध्ये हीच खाण्याची सवय लाइफटाईम तशीच राहू शकते. त्यासोबतच सिबलिंग रायवलरीसुद्धा वजन वाढण्याची एक शक्यता असू शकते. असेही होऊ शकते की, पहिल्यांदा जन्माला आलेली मुले ही दुसऱ्यांदा मुलांसोबत खाण्याबाबत कॉम्पिटिशन करतील.