d m mirasdar

मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार (D.M. Mirasdar Passed Away)यांचे पुण्यातील(Pune) राहत्या घरी वृद्धापकाळाने आज निधन झाले आहे.

    मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार (D.M. Mirasdar Passed Away)यांचे पुण्यातील(Pune) राहत्या घरी वृद्धापकाळाने आज निधन झाले आहे. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. ते ९४ वर्षाचे होते.

    मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर त्यांनी एम. ए. केलं. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

    मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या कायम मनात घर करून आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.

    मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.