‘दहा क्लासिक्स’ आता इंग्रजी व हिंदी भाषेतही प्रकाशित

सुप्रसिद्ध लेखिका व सिने अभ्यासक अनिता पाध्ये लिखित 'दहा क्लासिक्स' हे लोकप्रिय ठरलेले पुस्तक नुकतेच इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहे.

मुंबई : सुप्रसिद्ध लेखिका व सिने अभ्यासक अनिता पाध्ये लिखित ‘दहा क्लासिक्स’ हे लोकप्रिय ठरलेले पुस्तक नुकतेच इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात ‘दो बिघा जमीन, दो आखें बारा हाथ, पाकिज़ा, मदर इंडिया, प्यासा, मुघले आझम, गाइड, तीसरी कसम, आनंद, उमराव जान अशा दहा अभिजीत हिंदी चित्रपटांचा निर्मिती प्रवास लेखिकेने अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला आहे. या पुस्तकासाठी अनिता पाध्ये यांनी जवळपास अडीच वर्षे संशोधन केले तसेच या सर्व चित्रपटांशी निगडीत व्यक्तींशी बोलून अतिशय दुर्मिळ माहिती वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. या पुस्तकात दुर्मिळ फोटो देखील समाविष्ट केले आहेत.