1/10
लॉकडाऊन. हा शब्द केवळ भारतीयांनीच नव्हे तर पूर्ण जगानं पहिल्यांदा अनुभवला. यापूर्वी हा शब्द एखादा कारखाना, इंडस्ट्री किंवा संस्था बंद होण्यापुरता वापरता जायचा. मात्र अख्खा देश लॉकडाऊन झालेला पहिल्यांदाच दिसला.

2/10
वर्क फ्रॉम होम. कामाची ही नवी पद्धत नाईलाज म्हणून अनेक संस्थांना सुरू करावी लागली. मात्र गेल्या आठ महिन्यांत ते एक नवं ‘वर्क कल्चर’ म्हणून उदयाला येतंय. कंपन्यांचे जागेचे भाडे, वीजेचे बिल, इंटरनेटचे बिल, प्रवासी वाहनांवर होणारा खर्च वगैरे कमी होत असल्याने कर्मचारी आणि संस्था दोन्हींसाठी सोयीचा ठरणारा हा नवा पर्याय या वर्षात प्रत्यक्ष राबवला गेला. आता नव्या कामगार कायद्यातही ‘वर्क फ्रॉम होम’चा समावेश करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय.

3/10
4/10
टाळ्या आणि थाळ्या. कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यानंतर हा शब्द चांगलाच व्हायरल झाला. काही आठवड्यांनंतर हा शब्दप्रयोग सरकारवर टीका करण्यासाठी वापरला जाऊ लागला. ‘टाळ्या आणि थाळ्या’ वाजवणारं सरकार अशी टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली.

5/10
आत्मनिर्भर भारत. कोरोना संकटामुळे डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था आणि चीनकडून होणारं अतिक्रमण या पार्श्वभूमीवर ‘आत्मनिर्भर भारत’ हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. त्यानंतर या शब्दावरून अनेक कार्टून्स आणि मीम्सदेखील व्हायरल झाले.

6/10
मास्क आणि सॅनिटायझर. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात रोजच्या रोज वापरण्याच्या गोष्टींमध्ये या दोन बाबींची भर पडली ती याच वर्षी. घरून निघताना ‘मास्क आणि सॅनिटायझर घेतलं का?’ अशी आठवण करून दिली जाऊ लागली. नव्या लाईफस्टाईलचा या दोन गोष्टी भाग बनल्या.

7/10
सोशल डिस्टन्सिंग. एकमेकांपासून अंतर राखणे हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक प्रकार. गर्दी करू नका आणि एकमेकांपासून किमान ५ ते ६ फूट अंतर ठेऊन उभे राहा, हे सांगण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द प्रचलित झाला. काहीजणांनी या शब्दावर आक्षेपही घेतला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरावा, अशा सूचनाही करण्यात आल्या. मात्र अखेर ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्दच प्रचलित झाला.

8/10
आप क्रोनोलॉजी समझिए. एखाद्या प्रसंगाची किंवा प्रक्रियेची समीक्षा करताना घटना घडण्याचा जो क्रम असतो, त्याला क्रोनोलॉजी असं म्हटलं जातं. देशात एनआरसी-सीएए वरून आंदोलनं सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी एका संभाषणात ‘आप क्रोनोलॉजी समझिये’ असं म्हटलं होतं. त्यानंतर हा शब्दप्रयोग चांगलाच व्हायरल झाला. थट्टामस्करी आणि विडंबनासाठीदेखील या शब्दप्रयोगाचा वापर अनेकदा झाला. यावरून अमित शाह यांच्यावर अनेक मीम्सही बनवली गेली.

9/10
रिस्क है तो इश्क है. शेअर बाजार घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित मालिकेत हर्षद मेहताच्या तोंडी असलेलं हे वाक्य चांगलंच गाजलं. सोनी लिव्ह या ऍपवर ‘स्कॅम 1992’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली. हर्षद मेहताच्या दुष्कृत्यांना या मालिकेतून जस्टीफाय करण्यात आल्याचा आरोपही झाला.

10/10
प्रोफेसर. नेटफ्लिकवरील ‘मनी हाईस्ट’ या वेब सिरीजमधील प्रोफेसरचं प्रमुख पात्र भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत चर्चेचा विषय बनलं. शांतपणे योजना आखून त्यांची अंमलबजावणी सराईतपणे करणाऱ्या व्यक्तीला प्रोफेसर असं संबोधलं जाऊ लागलं.