नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा सज्ज :  पर्यटनस्थळी लगबग ; पोलीस व वनविभागाचा राहणार वॉच

अकोले : नाताळ, सलग सुट्ट्या आणि गतवर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग भंडारदरा पर्यटनस्थळावर िदसून येत आहे. अकोले (जि. नगर) तालुक्यातील भंडारदरा धरण व परिसरात पर्यटकांच्या गर्दी होईल, हे गृहीत धरून व्यावसायिक, पर्यटन, पोलीस व वनविभाग सज्ज झाला आहे.

अकोले : नाताळ, सलग सुट्ट्या आणि गतवर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग भंडारदरा पर्यटनस्थळावर िदसून येत आहे. अकोले (जि. नगर) तालुक्यातील भंडारदरा धरण व परिसरात पर्यटकांच्या गर्दी होईल, हे गृहीत धरून व्यावसायिक, पर्यटन, पोलीस व वनविभाग सज्ज झाला आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे परिसरातील तंबूधारक  (टेन्ट) हॉटेल व्यावसायिक व वन विभाग प्रशासनानकडून नियम व अटीचे पालन करण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून िदल्या जाणार अाहेत. भंडारदरा धरण परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत गर्दीवर काहीसा परिणाम जाणवणार असल्याचे दिसत आहे. तरुण व्यावसायिक मात्र उत्साही असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई
येणाऱ्या पर्यटकांची सुविधा, खबरदारी व जबाबदारी स्वीकारत वनविभागाने अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करताना ठिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क लावा, सॅनिटाझरचा वापर करा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, असे सूचना फलक लावले आहेत. राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी देखील
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकांना नियम, अटी घालून दिल्या असून कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर तंबूधारक (टेन्ट) तरुण व्यावसायिकांनी देखील सर्व नियम व अटीचे पालन करत योग्य ती खबरदारी घेत पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.