मुंबईत कोरोनाचे १०४४ नवे रुग्ण

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मंगळवारी रुग्ण संख्येत घसरण ज़ाल्याचे दिसून आली, परंतु बुधवारी पुन्हा  वाढ ज़ाल्याचे समोर आले आहे. मागील दोन दिवस रुग्ण संख्येत घसरण ज़ाल्याने दिलासा मिळाला असला तरीही पुन्हा ज़ालेली वाढ चिंता व्यक्त करत आहे.

बुधवारी कोरोनाने ३२  जणाचा बळी घेतला आहे.बुधवारी मुंबईमध्ये १०४४नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजार ८३४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १०९७ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या ३२ जणांमधील १५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १९  पुरुष तर १३ महिलांचा समावेश आहे.मृतांमधील  तीन जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. १२ जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८९३ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ७१५ वर पोहचली आहे. तसेच २४०  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९०५४  जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.