प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आज १३७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात आज १३७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या ९३ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर आजवर ८९ हजार ७४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण भोसरी (५७ वर्ष), वल्लभनगर (८५ वर्ष), मोशी (३४ वर्ष), थेरगाव (८२ वर्ष), बारामती (८० वर्ष) येथील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील १६६८ तर शहराच्या बाहेरील ६८५ रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

सध्या शहरात ९१८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर ११८२ जणांना होम आइसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. शहरातील १२४ रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकूण ९१३ जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.