राज्यात १४,१५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २८९ जणांचा कोरोनाने घेतला बळी

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची(Corona Patients in Maharashtra) एकूण संख्या ५८,०५,५६५ झाली आहे. आज २०,८५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

    मुंबई: शुक्रवारी राज्यात १४,१५२ नवीन कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची(Corona Patients in Maharashtra) एकूण संख्या ५८,०५,५६५ झाली आहे. आज २०,८५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,०७,०५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,९६,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज २८९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २८९ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील ३८६ मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. तसेच आज राज्यातील ३१ मे २०२१ पर्यंतच्या मृत्यूंच्या रिकन्सिलीएशन प्रक्रियेत ७०२ मृत्यूंची वाढ झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १०८८ ने वाढली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६०,३१,३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,०५,५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,७५,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ९६८ नवे रुग्ण
    मुंबईत दिवसभरात ९६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०८९९४ एवढी झाली आहे. तर २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १४९२२ मृत्यूची नोंद करण्यात आली.