राज्यात दिवसभरात १५,०७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद – ३३,००० जण कोरोनातून झाले मुक्त

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० कोरोनाबाधित(Corona Patients) रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  मुंबई: सोमवारी राज्यात १५,०७७ नवीन रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,४६,८९२ झाली आहे. आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  राज्यात सोमवारी १८४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१६ ने वाढली आहे.

  हे ३१६ मृत्यू, पुणे-८५, नागपूर- ३४, लातूर-२८, अहमदनगर- २४, पालघर- २३, औरंगाबाद- १७, सातारा- १७, गोंदिया- १३, नांदेड- ११, अकोला- १०, नाशिक- १०, बीड- ७, ठाणे- ७, नंदूरबार- ६, कोल्हापूर- ५, सांगली- ५, सोलापूर- ४, यवतमाळ- ३, भंडारा- २, बुलढाणा- १, गडचिरोली- १, उस्मानाबाद- १, वर्धा- १ आणि रत्नागिरी- १ असे आहेत.

  सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ६६६ नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०५२८८ एवढी झाली आहे. तर २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १४८२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.