राज्यात गेल्या २४ तासांत १५१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, २ हजार ७७२ पोलिसांवर उपचार (Active Cases) सुरू असून ११ हजार ८६७ पोलीस कोरोनामुक्त (Recoveries ) झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १५३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. मात्र, पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या २४ तासांत १५१ पोलिसांना कोरोनाची लागण (Corona Positive ) झाल्याची माहिती समोर आली आहे. तर पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू (died ) झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ७९२ वर पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ हजार ७७२ पोलिसांवर उपचार (Active Cases) सुरू असून ११ हजार ८६७ पोलीस कोरोनामुक्त (Recoveries ) झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १५३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. मात्र, पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यातील १४ हजार ७९२ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५७४ अधिकारी व १३ हजार २१८ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या २ हजार ७७२ पोलिसांमध्ये ३५८ अधिकारी व २ हजार ४१४ कर्मचारी आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सात लाखांच्याही पुढे गेली आहे. मात्र, राज्यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच कोरोना योद्धांना देखील कोरोना विषाणूचा सर्वात मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचे दिसत आहे.