Corona-Virus-Latest-update

आज २५,६१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,८६,२०६ कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients) बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३% (Corona Recovery Rate) एवढे झाले आहे.

  मुंबई: गुरुवारी राज्यात(Corona) १५,२२९ नवीन कोरोना रुग्णांची(Corona Patients in Maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,९१,४१३ झाली आहे. आज २५,६१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,८६,२०६ कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients) बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,०४,९७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान राज्यात आज ३०७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण ३०७ मृत्यूंपैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३३६ ने वाढली आहे.

  हे ३३६ मृत्यू, नागपूर-८०, पुणे-७८, वर्धा-२४, औरंगाबाद-२१, गडचिरोली-१९, रायगड-१८, अहमदनगर-१५, भंडारा-१३, लातूर-१२, नाशिक-९, सांगली-८, उस्मानाबाद-६, नंदूरबार-५, नांदेड-४, सातारा-४, बीड-३, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-३, अकोला -२, जालना-२, चंद्रपूर-१, धुळे-१, पालघर-१, परभणी-१, रत्नागिरी-१, ठाणे-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

  सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५७,७४,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,९१,४१३ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,६६,४९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ९८५ नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात ९८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०८०२६ एवढी झाली आहे. तर २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४९०७ मृत्यूची नोंद करण्यात आली.