राज्यात १८,०५६ नवीन कोरोनाग्रस्त

३८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू

मुंबई :रविवारी राज्यात १८,०५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १३,३९,२३२ झाली आहे. तर आज १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १०,३०,०१५ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१ % एवढे झाले आहे.तर राज्यात आज रोजी एकूण २,७३,२२८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ३८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६६ % एवढा आहे. तसेच नोंद झालेल्या एकूण ३८० मृत्यूंपैकी २०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८४ मृत्यू ठाणे -१५, चंद्रपूर -१३, कोल्हापूर -१०, पुणे -१०, सातारा -९,सांगली -७, अहमदनगर -६, रत्नागिरी -३, नागपूर -२, नांदेड -२, भंडारा -१, जळगाव -१, नंदूरबार -१, उस्मानाबाद -१,परभणी -१, यवतमाळ -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ (२०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.