Corona

मुंबई : राज्यात १८,३९० नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२,४२,७७० झाली आहे. राज्यात २,७२,४१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३३,४०७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६९ टक्के एवढा आहे.

राज्यात ३९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५०, ठाणे १९, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा ५, मीरा भाईंदर मनपा ६, वसई विरार मनपा ८, रायगड १७, नाशिक ९, अहमदनगर १६, जळगाव १७, पुणे ६०, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर १४, सातारा १४, कोल्हापूर २१, सांगली १८, औरंगाबाद ५, लातूर ९, उस्मानाबाद ८, नांदेड १४, अमरावती २, नागपूर २१ आणि अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३९२ मृत्यूंपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६८ मृत्यू पुणे २०, अहमदनगर ७ , नागपूर ७, ठाणे ७, कोल्हापूर ५, पालघर ५, सातारा ४, नाशिक २, सोलापूर २, चंद्रपूर १, जालना १, उस्मानाबाद १, रायगड १, वाशिम १, मुंबई १ आणि कर्नाटक ३ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६०,१७,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,४२,७७० (२०.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९,३६,५५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के एवढे झाले आहे.