राज्यात २२,०८४ नवे कोरोना रुग्ण, ३९१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात(state) कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पुन्हा २० हजाराच्या प्रमाणात झाली. आज २२,०८४ कोरोना(corona) रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०,३७,७६५ झाली आहे. तर आज ३९१ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यांचा आकडा २,९११५वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात १३,४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

दरम्यान राज्यात दिवसभरात  ३९१ मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा २८,२८२ वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या ३९१ मृत्यूंपैकी२८० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,७९,७६८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आज १३,४८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत ७,२८,५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ % एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण ३९१मृत्यूंची नोंद झाली.त्यापैकी ठाणे परिमंडळ ७७, पुणे १०१,नाशिक ४०, कोल्हापूर ६३ ,औरंगाबाद  १८, लातूर मंडळ २७,अकोला मंडळ १९ ,नागपूर ४३ व इतर राज्य ३ येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८१ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५१,६४,८४० नमुन्यांपैकी १०,३७,७६५ ( २०.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५२,९५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२७५लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत