राज्यात २२५० नवे रुग्ण

६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्ण ३९२९७ मुंबई:राज्यात बुधवारी २२५० नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. तर ६५ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १३९० वर पोहचली

६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्ण ३९२९७

मुंबई: राज्यात बुधवारी २२५० नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. तर ६५ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १३९० वर पोहचली आहे.
 त्याचप्रमाणे ६७९ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत १० हजार ३१८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 
 
राज्यात सोमवारपासून दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
 राज्यात बुधवारी २२५० नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. तसेच ६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मुंबईमध्ये ४१, पुणे १३ नवी मुंबई ३, पिंपरी चिंचवड २, सोलापूर २, उल्हासनगर २, औरंगाबाद २ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये ( ७४ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 
 
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,०७,०७२ नमुन्यांपैकी २,६७,७७५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९,१९७ पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १८४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,४९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 
 
सध्या राज्यात ४,०४,६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६,७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.