दिलासादायक – राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये घट, दिवसभरात २४,१३६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients in Maharashtra) एकूण संख्या ५६,२६,१५५ झाली आहे. आज ३६,१७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    मुंबई:आज राज्यात २४,१३६ नवीन कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patients in Maharashtra) एकूण संख्या ५६,२६,१५५ झाली आहे. आज ३६,१७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    राज्यात आजपर्यंत एकूण ५२,१८,७६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,१४,३६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ६०१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ६०१ मृत्यूंपैकी ३८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
    यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५३६ ने वाढली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३५,४१,५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,२६,१५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,१६,४२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १०२९ नवे रुग्ण
    मुंबईत दिवसभरात १०२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६९८९८८ एवढी झाली आहे. तर ३७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४६५० मृत्यूची नोंद करण्यात आली.