राज्यात २४८७ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी २४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. तसेच ८९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२८६ वर

 मुंबई : राज्यात रविवारी २४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. तसेच ८९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे १,२४८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २९,३२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यात ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

मुंबई -५२, नवी मुंबई -९,ठाणे – ५, कल्याण डोंबवली -४, मालेगाव -६, पुणे -९, सोलापूर -२, उस्मानाबाद -१, यवतमाळ १, आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७ रुग्ण आहेत तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ८९ रुग्णांपैकी ५६ जणांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६,कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,६२,१७६ नमुन्यांपैकी ६७,६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे. 

राज्यात सध्या कंटेनमेंट ३१५७ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,४९० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,५८,१०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

मुंबई महानगरपालिका ३९६८६ १२७९ 

ठाणे ७०९ ७ 

ठाणे मनपा ३७२१ ८२ 

नवी मुंबई मनपा २६७३ ६१ 

कल्याण डोंबवली मनपा १३१८ २५ 

उल्हासनगर मनपा ३३१ ६ 

भिवंडी निजामपूर मनपा १३४ ६ 

मीरा भाईंदर मनपा ६९९ १३ 

पालघर १४४ ३ 

१० वसई विरार मनपा ८७४ २७ 

११ रायगड ६०९ १८ 

१२ पनवेल मनपा ४९९ २१ 

ठाणे मंडळ एकूण ५१३९७ १५४८ 

१३ नाशिक १६२ ० 

१४ नाशिक मनपा २२५ ८ 

१५ मालेगाव मनपा ७४८ ५८ 

१६ अहमदनगर ९४ ६ 

१७ अहमदनगर मनपा २६ ० 

१८ धुळे ३६ ८ 

१९ धुळे मनपा १०४ ८ 

२० जळगाव ४४९ ६३ 

२१ जळगाव मनपा १६७ ९ 

२२ नंदूरबार ३५ ३ 

नाशिक मंडळ एकूण २०४६ १६३ 

२३ पुणे ५४७ १२ 

२४ पुणे मनपा ६९०४ ३०८ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा ४६८ ९ 

२६ सोलापूर ४६ ३ 

२७ सोलापूर मनपा ८५१ ६७ 

२८ सातारा ५२३ १६ 

पुणे मंडळ एकूण ९३३९ ४१५ 

२९ कोल्हापूर ४२८ ४ 

३० कोल्हापूर मनपा २९ ० 

३१ सांगली १०१ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १ 

३३ सिंधुदुर्ग ३३ ० 

३४ रत्नागिरी २६४ ५ 

कोल्हापूर मंडळ एकूण ८६६ १० 

३५ औरंगाबाद ३९ १ 

३६ औरंगाबाद मनपा १४६२ ६४ 

३७ जालना १२५ ० 

३८ हिंगोली १४९ ० 

३९ परभणी ४३ १ 

४० परभणी मनपा २० ० 

औरंगाबाद मंडळ एकूण १८३८ ६६ 

४१ लातूर ९८ ३ 

४२ लातूर मनपा २७ ० 

४३ उस्मानाबाद ७३ १ 

४४ बीड ४७ ० 

४५ नांदेड २४ ० 

४६ नांदेड मनपा ८७ ६ 

लातूर मंडळ एकूण ३५६ १० 

४७ अकोला ४४ ५ 

४८ अकोला मनपा ५४० २३ 

४९ अमरावती १६ २ 

५० अमरावती मनपा २१० १४ 

५१ यवतमाळ १३० १ 

५२ बुलढाणा ६२ ३ 

५३ वाशिम ० 

अकोला मंडळ एकूण १०१० ४८ 

५४ नागपूर २७ ० 

५५ नागपूर मनपा ५४७ १० 

५६ वर्धा १२ १ 

५७ भंडारा ३२ ० 

५८ गोंदिया ६६ ० 

५९ चंद्रपूर १६ ० 

६० चंद्रपूर मनपा ० 

६१ गडचिरोली ३५ ० 

नागपूर एकूण ७४४ ११ 

इतर राज्ये /देश ५९ १५ 

एकूण ६७६५५ २२८६.