राज्यातील कोरोनाबाधितांची २५ हजार पार ;  १४९५ नवे रुग्ण तर ५४ जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात बुधवारी १४९५ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णाची संख्या २५ हजार पार गेली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. तर ५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९७५

मुंबई : राज्यात बुधवारी १४९५ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णाची संख्या २५ हजार पार गेली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. तर ५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९७५ इतकी झाली आहे. 

 
राज्यात ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईमधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २ , सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. मृतांमध्ये ३३ पुरुष तर २१ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. बुधवारी ४२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५५४७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. 
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,३०,८५७ नमुन्यांपैकी २,०३,४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २५,९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 
 
राज्यात सध्या १४३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३,८०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,९८,२१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
 
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 
१ मुंबई महानगरपालिका १५७४७ ५९६ 
२ ठाणे १५७ ३ 
३ ठाणे मनपा ११२२ ११ 
४ नवी मुंबई मनपा १०१८ ४ 
५ कल्याण डोंबवली मनपा ४१२ ३ 
६ उल्हासनगर मनपा ७२ ० 
७ भिवंडी निजामपूर मनपा ३९ २ 
८ मीरा भाईंदर मनपा २४५ २ 
९ पालघर ४० २ 
१० वसई विरार मनपा २८६ ११ 
११ रायगड १५८ २ 
१२ पनवेल मनपा १५० ८ 
ठाणे मंडळ एकूण १९४४६ ६४४ 
१३ नाशिक ८८ ० 
१४ नाशिक मनपा ४६ ० 
१५ मालेगाव मनपा ६१७ ३४ 
१६ अहमदनगर ५४ ३ 
१७ अहमदनगर मनपा १० ० 
१८ धुळे ९ ३ 
१९ धुळे मनपा ६२ ३ 
२० जळगाव १६२ १७ 
२१ जळगाव मनपा ४४ ९ 
२२ नंदूरबार २२ २ 
नाशिक मंडळ एकूण १११४ ७१ 
२३ पुणे १८० ५ 
२४ पुणे मनपा २८३० १६१ 
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५१ ४ 
२६ सोलापूर ९ ० 
२७ सोलापूर मनपा ३११ २१ 
२८ सातारा १२५ २ 
पुणे मंडळ एकूण ३६०६ १९३ 
२९ कोल्हापूर १६ १ 
३० कोल्हापूर मनपा ६ ० 
३१ सांगली ३५ ० 
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६ १ 
३३ सिंधुदुर्ग ७ ० 
३४ रत्नागिरी ६० ३ 
कोल्हापूर मंडळ एकूण १३० ५ 
३५ औरंगाबाद ९४ ० 
३६ औरंगाबाद मनपा ५८६ १७ 
३७ जालना १६ ० 
३८ हिंगोली ६१ ० 
३९ परभणी १ १ 
४० परभणी मनपा १ ० 
औरंगाबाद मंडळ एकूण ७५९ १८ 
४१ लातूर ३२ १ 
४२ लातूर मनपा ० ० 
४३ उस्मानाबाद ४ ० 
४४ बीड १ ० 
४५ नांदेड ५ ० 
४६ नांदेड मनपा ५२ ४ 
लातूर मंडळ एकूण ९४ ५ 
४७ अकोला १८ १ 
४८ अकोला मनपा १७४ ११ 
४९ अमरावती ५ २ 
५० अमरावती मनपा ८४ ११ 
५१ यवतमाळ ९९ ० 
५२ बुलढाणा २५ १ 
५३ वाशिम ३ ० 
अकोला मंडळ एकूण ४०८ २६ 
५४ नागपूर २ ० 
५५ नागपूर मनपा ३१५ २ 
५६ वर्धा १ १ 
५७ भंडारा १ ० 
५८ गोंदिया १ ० 
५९ चंद्रपूर १ ० 
६० चंद्रपूर मनपा ३ ० 
६१ गडचिरोली ० ० 
नागपूर एकूण ३२४ ३ 
इतर राज्ये ४१ १० 
एकूण २५९२२ ९७५