राज्यात २५५३ नवे रुग्ण तर १०९ करोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :रविवारी राज्यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण साापडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती, अस असताना सोमवारी राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. सोमवारी

मुंबई : रविवारी राज्यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण साापडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती, अस असताना सोमवारी राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. 

सोमवारी २५५३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ५२८ झाली आहे. तर राज्यात तब्बल 109 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१६९ वर पोहोचली असून, राज्यातील मृत्यू दर हा 3.57 टक्के इतका आहे.सोमवारी राज्यामध्ये १६६१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ४० हजार ९७५ करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६.२८ टक्के एवढे आहे. 

राज्यात १०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामध्ये मुंबई  ६४, कल्याण डोंबिवली २, उल्हास नगर १, वसई विरार १,भिवंडी १, ठाणे १, नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १, पुणे ७, सोलापूर ६, रत्नागिरी ३, औरंगाबाद ८, जालना १, नांदेड १ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ५ जूनदरम्यानचे आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५१, औरंगाबाद ८, रत्नागिरी ३, धुळे ४, अहमदनगर १, भिवंडी १, जळगाव १, जालना १, कल्याण डोंबिवली १, नाशिक १, पुणे १, सोलापूर १, ठाणे १, उल्हासनगर १ आणि वसई विरार १ असे मृत्यू आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,६४,३३१ नमुन्यांपैकी ८८,५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३५१० झोन क्रियाशील असून आज एकूण १७,८९५ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.८४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६४,७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६,७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.