राज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :राज्यात बुधवारी २५६० नवे रुग्ण सापडले असून, कोरोनाबाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. त्याचप्रमाणे १२२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा २५८७ वर पोहोचला आहे.आज ९९६ रुग्ण बरे

मुंबई :राज्यात बुधवारी २५६० नवे रुग्ण सापडले असून, कोरोनाबाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. त्याचप्रमाणे १२२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा २५८७ वर पोहोचला आहे.  आज ९९६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ३२ हजार ३२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

१ मे ते १ जूनदरम्यान राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जूनला तो देशाच्या सरासरी पेक्षा ( ४.७४ % ) देखील कमी झालेला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत आहे. 

१ मे रोजी रुग्ण वाढीचा दर ७.७६ टक्के होता. त्याचवेळी रुग्ण दुपटीचा वेग ९.२७ दिवस इतका होता. मात्र मे महिन्यामध्ये रुग्ण वाढीचा दर सातत्याने कमी होण्याबरोबरच रुग्ण दुपटीचा वेगही वाढताना दिसत आहे. १५ मे रोजी  रुग्ण वाढीचा दर  ६.२३ टक्के तर  रुग्ण दुपटीचा वेग ११.५६ दिवस झाला. त्याचप्रमाणे ३० मे रोजी हाच दर ४.७२ टक्के, तर दुपटीचा वेग १५.२६ दिवस झाला. १ जूनला ४.१५ टक्के, तर १७.३५ दिवस झाला.

राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यामध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे  २,मीरा भाईंदर १, वसई विरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १,नंदूरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २, तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०,सोलापूर १०, औरंगाबाद ६, नवी मुंबई ३, धुळे ३, जळगाव २, कोल्हापूर २, ठाणे २, अहमदनगर १, अकोला १, नंदूरबार १,पुणे १ , उल्हासनगर १, वसई विरार १ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत. 

कोविड१९ निदानासाठी सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,९७,२७६ नमुन्यांपैकी ७४,८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६६१ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,९५० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.४८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,७१,९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१,९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३,६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.