राज्यात २६०८ नवे रुग्ण ; ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शनिवारी राज्यात तब्बल २६०८ नवीन रुग्णांची सापडले. आतापर्यंत हे सर्वाधिक रुग्ण असून राज्यातील कोरोनाबाधित

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शनिवारी राज्यात तब्बल २६०८ नवीन रुग्णांची सापडले.
आतापर्यंत हे सर्वाधिक रुग्ण असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. त्याचप्रमाणे ६० जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांची संख्या १५७७ वर पोहोचली.शनिवारी ८२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत १३ हजार ४०४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
 
राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.त्यामध्ये मुंबईत ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साता-यात १, ठाणे १ तर नांदेड १ मृत्यू झाले आहेत.मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत. मृतांमध्ये ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,४८,०२६ नमुन्यांपैकी २,९८,६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७,१९०जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,८५,६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३,५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
 
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २८,८१७ (९४९)
ठाणे: ३९४ (४) 
ठाणे मनपा: २४४०५ (३५)
नवी मुंबई मनपा: १७७८ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ७८४ (७)
उल्हासनगर मनपा: १४५ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४४२ (४)
पालघर:१११ (३)
वसई विरार मनपा: ४९९ (१५)
रायगड: ३२१ (५)
पनवेल मनपा: २९५ (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३६,१७३ (१०६९)
नाशिक: ११५
नाशिक मनपा: १०५ (२)
मालेगाव मनपा: ७११ (४४)
अहमदनगर: ५३ (५)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १७ (३)
धुळे मनपा: ८० (६)
जळगाव: २९० (३६)
जळगाव मनपा: ११३ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५३५ (१०३)
पुणे: ३१२ (५)
पुणे मनपा: ४८०५ (२४५)
पिंपरी चिंचवड मनपा: २३० (७)
सोलापूर: २२ (१)
सोलापूर मनपा: ५४५ (३४)
सातारा: २०४ (५)
पुणे मंडळ एकूण: ६११८ (२९७)
कोल्हापूर:२०६ (१)
कोल्हापूर मनपा: २३ 
सांगली: ६३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी:  १४२ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५५ (५)
औरंगाबाद:२२
औरंगाबाद मनपा: ११९७ (४२)
जालना: ५४
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १४०७ (४३)
लातूर: ६४ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: २९
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८५ (५)
लातूर मंडळ एकूण: २२० (७)
अकोला: ३१ (२)
अकोला मनपा: ३४२ (१५)
अमरावती: १३ (२)
अमरावती मनपा:  १४३ (१२)
यवतमाळ: ११३
बुलढाणा: ३९ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:६८९ (३४)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ४६२ (७)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ९
गोंदिया: ३९
चंद्रपूर:  ८
चंद्रपूर मनपा: ७
गडचिरोली: १३
नागपूर मंडळ एकूण:  ५४५ (८)
इतर राज्ये: ४८ (११)
एकूण:  ४७ हजार १९०  (१५७७)