राज्यात २७०१ नवे रुग्ण तर ८१ जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात मंगळवारी २७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,१३,४४५ झाली आहे, तर ऍक्टिव्ह रुग्ण ५० हजार ४४ रुग्ण आहेत. राज्यात आज ८१ करोना बाधित रुग्णांचे

मुंबई : राज्यात मंगळवारी २७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,१३,४४५ झाली आहे, तर ऍक्टिव्ह रुग्ण ५० हजार ४४ रुग्ण आहेत. राज्यात आज ८१ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाला असून पूर्वीच्या १३२८ मृत्यूची नोंद झाली आहे. १८०२ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ५७ हजार ८५१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 
 
राज्यात ८१ कोविड १९ मृत्यू झाले आहेत. मुंबई ५५, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ११, अहमदनगर २, पुणे १, पुणे मनप ७, पिंपरी चिंचवड मनपा १ असे मृत्यू झाले आहेत. याशिवाय मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. 
 
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,८४,२६८ नमुन्यांपैकी १,१३,४४५ (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८६,६८६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७,२४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.