राज्यात मागील २४ तासांत २७८६ नवे रुग्ण, १७८ जणांचा मृत्यू

मुंबई - राज्यात सोमवारी २७८६ नवीन रुग्ण सापडले असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,१०,७४४ वर पोहोचली आहे. तर ५०,५५४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी १७८ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात

मुंबई – राज्यात सोमवारी २७८६ नवीन रुग्ण सापडले असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,१०,७४४ वर पोहोचली आहे. तर ५०,५५४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी १७८ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृत्यूंची संख्या ४१२८ झाली आहे. आज ५०७१ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत ५६,०४९ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ते ५०.६१ टक्के एवढे झाले आहे.   राज्यात १७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. मुंबई ६८, वसई विरार २०, मीरा भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२ , पनवेल ७, कल्याण डोंबिवली ९, पालघर १, रायगड १, पुणे १४, सोलापूर २, धुळे १३, जळगाव ३, रत्नागिरी -१, जालना २ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी १२२ पुरुष तर ५६ महिला आहेत.

आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ % ) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार १९, मीरा भाईंदर १२, नवी मुंबई १२, धुळे १०, ठाणे ११ , पनवेल ७, कल्याण डोंबिवली ८, जळगाव २, जालना २, पालघर १,सोलापूर १ आणि रायगड १ मृत्यू असे आहेत.  राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,६९,९९४ नमुन्यांपैकी १,१०,७४४ ( १६.५२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८९,१५८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात१५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८,०८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.