राज्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये वाढले २९,६४४ रुग्ण, ५५५ जणांचा कोरोनाने घेतला बळी

राज्यातील कोरोनाबाधित(Corona Patients in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या ५५,२७,०९२ झाली आहे. आज ४४,४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

    मुंबई: शुक्रवारी राज्यात २९,६४४ नवीन कोरोना(Corona Patient) रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित(Corona Patients in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या ५५,२७,०९२ झाली आहे. आज ४४,४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात काल ५५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५५५ मृत्यूंपैकी ३६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील ७०८ मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्येत ७०८ ने वाढ झाली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १४१५ रुग्ण
    मुंबईत दिवसभरात १४१५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६९४२०० एवढी झाली आहे. तर ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १४४६४ मृत्यूची नोंद करण्यात आली.