राज्यात २९,९११ नव्या रुग्णांची नोंद, ४७,३७१ रुग्ण झाले कोरोनामुक्त

आज ४७,३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ५०,२६,३०८ कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients) बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

  मुंबई: गुरुवारी राज्यात २९,९११ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,९७,४४८ झाली आहे. आज ४७,३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ५०,२६,३०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४३% एवढे झाले आहे.राज्यात आज रोजी एकूण ३,८३,२५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान राज्यात आज ७३८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यातील कोविड १९ आकडेवारीचे दिनांक १३ मे २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे.

  या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णांच्या प्रगतीपर आकडेवारीत २४६ ने वाढ झाली आहे तसेच इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये ३३ ने घट झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

  सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात १४३३ नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात १४३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६९२७८५ एवढी झाली आहे. तर ५९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १४४१० मृत्यूची नोंद करण्यात आली.