दिलासादायक – राज्यात दिवसभरात आढळलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले(Patients Recovered) आहेत. तसेच ३ हजार ७४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद(Corona Patients In Maharashtra) झाली आहे. दिवसभरात ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death)झाला आहे.

    मुंबई: राज्यात आज दिवसभरात(Maharashtra Corona Update) आढळलेल्या कोरोनाबाधित(Corona Patients) रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येतही घट झाली आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले(Patients Recovered) आहेत. तसेच ३ हजार ७४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद(Corona Patients In Maharashtra) झाली आहे. दिवसभरात ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death)झाला आहे.

    राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्क्यांवर आले आहे.

    राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६४,६०,६८० झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३७२०९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ५,३८,१२,८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६०,६८०(१२.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार २९९ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१,८३४ सक्रीय रुग्ण आहेत.