राज्यात ३७५२ नवे रुग्ण, १०० जणांचा मृत्यु

मुंबई :राज्यात गुरुवारी ३७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १,२०,५०४ झाली आहे. तर ५३ हजार ९०१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १०० करोना बाधित रुग्णांच्या

मुंबई : राज्यात गुरुवारी ३७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १,२०,५०४ झाली आहे. तर ५३ हजार ९०१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५७५१ वर पोहोचली आहे. आज १६७२ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४९ % एवढे आहे. 

राज्यात गुरुवारी १०० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई विरार १, नागपूर मनपा १ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. 
 
राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१७६८३ नमुन्यांपैकी १,२०,५०४ ( १६.९३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,८१,६५० लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२,१४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६,७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.