क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्ग ४ लाख लोकांचे होणार सर्वेक्षण; आता पर्यंत १ लाख लोकांची तपासणी

क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातही सर्वेक्षण केले जात आहे.

 

पिंपरी: केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग ( TB )निर्मूलन कार्यक्रमांतर्ग पिंपरी चिंचवडमधील १ लाख जणांची क्षयरोगाची तपासणी करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सर्वेक्षणसाठी एकूण ७३ जणांची टीम कार्यरत आहे. एक ते ३१ डिसेंबर पर्यंत एकूण ४ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णावर आरोग्य विभागाच्या वतीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. हि तपासणी करण्यात येणार आहे.

क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने central Government पाऊल उचलले आहे. देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातही सर्वेक्षण केले जात आहे. डिसेंबर महिन्यात चार लोकांची तपासणी करण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. शहरातील झोपडपट्टी विभाग, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आदीसह विविध भागात तपासणी केली जाणार आहे. ७३ जणांची टीम यासाठी कार्यरत आहे. या मध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, क्षयरोग कर्मचारी व व्हॉलेंटियर आदींचा यामध्ये समावेश आहे.

दोन आठवडे पेक्षा अधिक दिवस खोकला असल्यास व वजन कमी झालेल्यांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घशातील बेडके तपासणीसाठी घेतले जात आहेत. तसेच एक्सरे देखील काढले जात आहेत. हि तपासणी मोफत केली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केले जात आहेत. या बाबत माहिती देताना शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी बाबासाहेब होडगर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. आता पर्यंत एक लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर त्वरित उपचार केले जात आहेत. एकूण ४ लाख लोकांचे सर्वेक्षण एका महिन्यात पूर्ण करणार आहे. तपासणी मोफत केली जात आहे.