Great relief to the students MHT-CET will be on the reduced curriculum nrvb

एमएचटी सीईटी(MHT -CET) प्रवेशासाठी तब्बल ४ लाख ०६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी(Sutdents Registration For MHT-CET) केली आहे.

  मुंबई: इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी(MHT -CET) प्रवेशासाठी तब्बल ४ लाख ०६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी(Sutdents Registration For MHT-CET) केली आहे. यामध्ये राज्यातील विद्यार्थी ३ लाख ९२ हजार २३२ आहेत तर राज्याबाहेरील विद्यार्थी १४ हजार ४४१ आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा नोंदणी कमी असून ही परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. याचा परिणाम नोंदणीवर झाला आहे. यंदा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंद केली. पीसीबी ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ८८ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी तर पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी १ लाख ४० हजार ९३१विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी ७७ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

  राज्यातून झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ३५ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्याखालोखाल अहमदनगर २३ हजार ७१५, नाशिक २१ हजार १३०, मुंबई १९ हजार ८६२, ठाणे १९ हजार २४२ या जिल्ह्यातून नोंदणी झाली. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

  मध्य प्रदेशमधून सर्वाधिक २१९६, उत्तर प्रदेश २२०७, बिहार १८४५, गुजरात ११०५, कर्नाटक १०२८ या राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. ही परीक्षा ऑगस्ट मध्ये घेण्याची तयारी सीईटी सेलच्या वतीने सुरु आहे. परीक्षेबाबत लवकरच सविस्तर वेळापत्रक व माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

  अशी झाली आहे नोंदणी
  राज्यातील विद्यार्थी – ३९२२३२
  राज्याबाहेरील विद्यार्थी – १४४४१
  एकूण – ४०६६७३

  ग्रूपनिहाय नोंदणी
  पीसीबी आणि पीसीएम – ७७२८७
  पीसीबी – १८८४५५
  पीसीएम – १४०९३१