छत्तीसगडमध्ये चकमकीत ४ माओवाद्यांचा खात्मा

मंगळवारच्या रात्रीत मुसळधार पाऊस असताना जवान जंगलात शोध मोहिम करत होते. तेव्हा छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यातील जंगलात ४ माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलानेही त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ४ माओवादी ठार झाले.

छत्तीसगड : कोरोना संकटाशी देश लढा देत असताना दहशतवादी आणि माओवाद्यांनी आपल्या कुरघोड्या सुरुच ठेवल्या आहेत. छत्तीसगडमध्ये पुन्हा जवानांची माओवाद्यांशी चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ४ माओवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. 

मंगळवारच्या रात्रीत मुसळधार पाऊस असताना जवान जंगलात शोध मोहिम करत होते. तेव्हा छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यातील जंगलात ४ माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलानेही त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ४ माओवादी ठार झाले. यातील २ ग्रामीण भागात राहणारे होते. तर २ माओवादी वेशातील होते. या माओवाद्यांकडून ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आढळला आहे. तसेच जवानांनी अजूनही शोधकार्य सुरुच ठेवले आहे. 

छत्तीसगडमधी जंगलात २०१ सीआऱपीएफ २२३ आणि डीआरजीच्या जवानांनी ही शोधमोहिम केली आहे. शोधमोहिम सुरु असताना त्यांचा सामना माओवाद्यांशी झाला. माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यामध्ये ४ माओवाद्यांचा मृत्यू झाला.