रायगड जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचे ४०२ नवे रुग्ण, १९ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४०२ नवीन रुग्ण आढळले  आहेत. रायगड जिल्ह्यात आजपासून नवीन लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज २६६  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात १३४ , पनवेल ग्रामीणमध्ये ६३ , अलिबाग ५० , पेण ३२  , खालापूर २९ , कर्जत २६ , उरण १७, रोहा १६ , श्रीवर्धन १३, महाड ९ ,म्हसळा ८, मुरुड ४ आणि सुधागडमध्ये एक रुग्ण आढळला आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ९२६०  झाली असून जिल्ह्यात २४९  जणांचा मृत्यू झाला आहे.

 रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४०२  नवीन रुग्ण सापडले असून २६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १९७   नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३४  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ७,
  अलिबाग ३,  उरण २, खालापूर २, व पेण , मुरुड , म्हसळा , महाड , आणि पोलादपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .    

पनवेल ग्रामीणमध्ये ६३ , अलिबाग ५० , पेण ३२  , खालापूर २९, कर्जत २६, उरण १७ , रोहा १६ ,  श्रीवर्धन १३,  महाड ९, म्हसळा ८, मुरुड ४ आणि सुधागडमध्ये एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात ३१३७२ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ९२६० पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २९६ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ५४७२ जणांनी मात केली असून ३५३९  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात २४९  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.