कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ५ नवे रूग्ण

कोल्हापूर - कोरोनाचे आणखी ५ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ५५ झाली आहे. आज सकाळी सीपीआर प्रशासनाने जाहीर केलेल्या ५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन आजरा तर

 कोल्हापूर – कोरोनाचे आणखी ५ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ५५ झाली आहे. आज सकाळी सीपीआर प्रशासनाने जाहीर केलेल्या ५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन आजरा तर दोघेजण राधानगरी तालुक्यातील आहेत.एकजण कोल्हापूरचा आहे. अद्याप पुण्या- मुंबई आणि अन्य ठिकाणाहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱयांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे अजून ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काल १७ मे रविवारी काल दिवसाभरात १४ नव्या रूग्णांची भर झाली होती. परंतु आज हा कोरोना बाधितांचा आकडा ५५ वर गेला आहे.