धारावीत ५३ नवे रुग्ण ; कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ११९८

मुंबई : धारावीत गेल्या २४ तासांत ५३ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ११९८ झाला आहे. धारावीत दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे, असे

मुंबई  :  धारावीत गेल्या २४ तासांत ५३ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ११९८ झाला आहे.  धारावीत दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे,  असे चित्र असताना देखील येथील नागरिक बाहेर फिरत असल्याची तक्रार आशा सेविका करत आहेत, या नागरिकांना आरोग्याबाबत सतत काळजी घेण्याबाबत सांगुनही नागरिक ऐकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प ,  इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी , सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला,  कुंचीकुरवे नगर,  कमला नेहरू नगर, विजय नगर, सुभाष नगर, धारावी कोळीवाड़ा, गणेश बिल्डिंग, धारावी पोलीस स्टेशन, शिव शक्ति नगर या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.धारावीत रुग्णांचा आकडा  वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता व्यक्त केली जात आहे.

दादरमध्ये ४ नवीन रुग्ण 

दादर परिसरात कोरोनाचे रोज नवे रुग्ण  आढळत असून शनिवारी दादर परिसरात ४ नवे रुग्ण आढळल्याने दादरमधील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. हे रुग्ण स्वराज सोसायटी, सूर्य किरण सोसायटी, आगर बाजार येथील आहेत.

माहीममध्ये  शनिवारी ११ नवे रुग्ण सापडले आहेत.

माहीम कोरोनाचे केंद्र बिंदू ठरत आहे. ज्यामुळे माहीम मधील कोरोना रुग्णांची संख्या १८७ वर पोहोचली आहे.  हे रुग्ण मुगल लेन, कालकींनवाडी, मोरी रोड, रहेजा हॉस्पिटल, माहिम पोलीस कॉलोनी, बेल व्यू या परिसरातील आहेत.