कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ६ नवे रुग्ण, कोरोना रूग्णांचा आकडा ३६ वर

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात आज एकाचवेळी ६वकोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आज सकाळी सकाळी खळबळ उडाली.या कोरोना ग्रस्त रुग्णातील बहुतांशी रुग्णांनी मुंबई, पुणे या रेड झोन सारख्या

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात आज एकाचवेळी ६वकोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आज सकाळी सकाळी  खळबळ उडाली.या कोरोना ग्रस्त रुग्णातील बहुतांशी रुग्णांनी  मुंबई, पुणे या रेड झोन सारख्या शहरातून प्रवास केला आहे.आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये एकजण राधानगरी येथील  २३ वर्षीय तरुण, ४५ वर्षीय सोनगे ता.कागल येथील महिला, जयसिंगपूर येथील २० व १८ वर्षीय दोन तरुण,तसेच गडहिंग्लज तालुक्यातील कवळे कट्टी येथील ३५ वर्षीय तरुण आणि भुदरगड येथील ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

मुंबई ,पुणे, औरंगाबाद सारख्या कोरोनाचे तांडव सुरू असलेल्या रेड झोन  शहरातील परिस्थिती पाहून घाबरलेले नागरिक बहुदा  कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना रेड झोन मधून एकतर्फी परवानगी मिळाल्याने कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करून जिल्ह्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु जिल्ह्याच्या एन्ट्री पॉईंटवर सतर्क असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या तपासणी नाक्यावरून थेट या प्रवाशांना जिल्हा सरकारी  रुग्णालयात आणून त्यांचे स्वैब घेतले जात आहेत.आणि त्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवले जात आहे. स्वैबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास अशा रुग्णांना तात्काळ कोरोना उपचार कक्षात दाखल करण्यात येत असल्याचे दिसून येते. गेल्या पाच दिवसापासून दररोज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमूळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३६ वर गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोणत्याही वेळी रेड झोन मध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.