राज्य सरकारकडून बदली सत्राचा नवा अध्याय, आता ‘या’ सात सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

राज्य सरकारने(State Government) सात महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या(Transfer) केल्या आहेत.

    मुंबई : राज्य सरकारने(State Government) सात महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या(Transfer) केल्या आहेत. या सात जणांची(7 Officers Transfered) माहिती पुढीलप्रमाणे आहे.

    अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव व्हि बी पाटील यांची बदली कोकण विभागीय आयुक्त पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आर विमला यांची नियुक्ती नागपुरच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली पुणे परिवहन सेवेत व्यवस्थापकीय संचालक या पदावर करण्यात आली आहे.

    नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांची बदली पुणे येथे राज्य आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सध्या नागपूर येथे आदिवासी विकास आयुक्त पदावर कार्यरत मनिषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे अतिरिक्त महापालिका आयुक्त जालाज शर्मा यांची बदली धुळे जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.