राज्यात दिवसभरात ८ हजार १५९ नवीन रुग्णांची नोंद, १६५ जणांचा कोरोनाने घेतला बळी

आज कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून(Corona Patients) बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यात(Maharashtra) ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

    राज्यातील(Coroma Maharashtra Update) कोरोना संसर्गाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित(Corona Patients) आढळून येत आहेत. आज कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

    राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.