प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर भररस्त्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे ती भाजी विकण्यासाठी आली असता अज्ञात हल्लेखोर तिच्याजवळ आला आणि त्याने पीडित महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या बाटलीतील अ‍ॅसिड महिलेवर ओतले. महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.

बेळगाव (Belgaon). जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर भररस्त्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे ती भाजी विकण्यासाठी आली असता अज्ञात हल्लेखोर तिच्याजवळ आला आणि त्याने पीडित महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या बाटलीतील अ‍ॅसिड महिलेवर ओतले. महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.

अ‍ॅसिड अंगावर पडल्यामुळे पीडितेने वेदनेने एकच आक्रोश केला. बाजारपेठेतील नागरिक पीडित महिलेच्या मदतीला धावून आले. तिच्या अंगावर पाणी ओतले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. अ‍ॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित महिला ही अ‍ॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पीडित महिलेला प्राथमिक उपचारानंतर अधिकच्या उपचारासाठी बेळगावला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार अ‍ॅसिड हल्लेखोराचा रायबाग पोलिस शोध घेत आहे. या घटनेमुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.