मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या हालचालीनंतर इतर मागासवर्ग संघटनाही आक्रमक,उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटनांचेही आंदोलन – छगन भुजबळ करणार नेतृत्व

उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटनाही आंदोलन(OBC Organization Protest) करणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांच्याच नेतृत्वात या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) १६ जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत आहे. त्याचवेळी इतर मागासवर्ग संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटनाही आंदोलन(OBC Organization Protest) करणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांच्याच नेतृत्वात या आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

    नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झाले. ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटनानी आक्रमक होत १७ जून रोजी दुपारी १२ वाजता राज्यभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.

    ओबीसींचे महिनाभर चालणार आंदोलन
    ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजातील नेते महिनाभर चालणाऱ्या या आंदोलनात राज्यातील तहसील कार्यालयावर २५ तारखेला निदर्शने करणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.

    राज्य सरकारने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी त्यानी केल असून मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेचा अध्यादेश काढण्यात आला नाही. तसेच मागासवर्गीय आयोगातील सदस्य राजकीय पक्षाचे असल्याने त्यात बदल करून नवे सदस्य नेमावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    संभाजीराजेची भूमिका संशयास्पद
    पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निषेध करताना त्यांनी आरोप केला की, पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा सरकारमधील एका मंत्र्याचा निर्णय आहे. ओबीसीमध्ये कुणालाही आम्ही वाटेकरु होऊ देणार नाही. संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. संभाजीराजे सांगत असलेली प्रक्रिया ही ओबीसी समाजातील आरक्षण मराठ्यांना मिळेल अशी आहे. राजे फक्त मराठा समाजाचे असत नाहीत. त्यांनी बहुजनांचा विचार केला पाहिजे. फक्त मराठा आरक्षण नाही तर ओबीसी आणि पदोन्नती आरक्षणाबाबतही भूमिका राजेंनी स्पष्ट करावी, अशी टिका देखील शेंडगे यांनी केली.