राज्यासाठी एप्रिल महिना ठरला धडकी भरवणारा; एका महिन्यात तब्बल २१ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

महाराष्ट्रात एप्रिल २०२१ या महिन्यात १७ लाख ८९ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसंच, एप्रिल महिन्यात कोरोनामुळे महाराष्ट्रात १४ हजार १६४ नागरिकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत एप्रिल महिन्यात दोन लाख ३३ हजार६९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि १४३५ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेने महाराष्ट्रात सर्वोच्च पातळी गाठली होती. त्या वेळपेक्षाही एप्रिल महिन्यातली आकडेवारी भीषण आहे.

    मुंबई : देशभरात कोरोना संसर्गाची जी दुसरी लाट आली तिचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी नुकताच सरलेला एप्रिल महिना कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा सर्वांत भयावह ठरला आहे. या महिन्यात महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ३८.८८ टक्के कोरोनाबाधितांची नोंद एप्रिल २०२१ या एकाच महिन्यात झाली आहे. तसंच कोरोनामुळे मरण पावलेल्या राज्यातल्या नागरिकांपैकी २०.५८ टक्के जणांचे मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यात झाले आहेत.

    एकट्या मुंबईचा विचार करताही एप्रिल महिना सर्वांत भीषण ठरला आहे. मुंबईतल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ३६ टक्के कोरोनाबाधितांची नोंद एप्रिल महिन्यात झाली, तर एकूण मृत्यूंपैकी १०.९३ टक्के मृत्यू एकट्या एप्रिलमध्ये नोंदवले गेले. एका वृत्तपत्राने या परिस्थितीचं विश्लेषण करणारं वृत्त दिलं आहे.