ओबीसींना मिळणाऱ्या सुविधा मराठा समाजाला मिळण्यासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज द्या,आशिष शेलार यांची मागणी

EWS मध्ये(EWS) टाकल्यामुळे मराठा समाज(Maratha Community) आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ना मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या यासाठी ३ हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केली.

    मुंबई : मराठा समाजाला(Maratha Community) EWS आरक्षण(EWS Reservation) मिळेल, असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता ते कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झालं. कारण १० टक्के ईडब्लूएस आरक्षण दिले, त्यात ठाकरे सरकारचे कर्तृत्व काय ? ते मोदी सरकारने दिले. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे, असा आरोप भाजप नेते आ. आशिष शेलार यानी केला आहे.

    ‘ओबीसी’ च्या सुविधा मराठा समाजाला द्या
    ते म्हणाले की, आमची मागणी आहे, गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळाले. मात्र यांनी EWS आरक्षण जाहीर केले, पण मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल, असे शेलार म्हणाले. EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ना मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या यासाठी ३ हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

    ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये
    ओबीसी राजकीय आरक्षण टिकवू शकले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थातील अतिरिक्त आरक्षणाचा खून मविआने पाडला. आरक्षणाचा मुडदा पडल्यानंतर वडेट्टीवार-भुजबळ हे सत्तेत मदमस्त कसे राहू शकतात? ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये, ही आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.