आपल्या काव्यमय शैलीत असे केले आठवलेंनी नव्या विधेयकांचे स्वागत

मुंबई : मजुरांच्या कल्याणकारी तीन नव्या विधेयकांचे(three new bills) आज संसदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी आपल्या खास काव्यमय शैलीत स्वागत केले.(welcome in poetic manner) तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळून जी कामे नियमित केली जातात तेथे कंत्राटी कामगार ही पद्धत बंद केली पाहिजे. कामगारांच्या हितासाठी कंत्राटी पद्धत बंद करणारा नवीन कायदा संसदेने करावा,असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या मजुरांच्या हिताच्या तीन विधेयकावर चर्चा करताना रामदास आठवले यांनी आपल्याला आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. ते देशाचे मजूर मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या न्यायासाठी अनेक कायदे केले. त्यांनी कामाचे १२ वरून ८ तासांचा दिवस करून कामगारांना न्याय दिला. कामगारांना साप्ताहिक सुट्टी तसेच महिला कामगारांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरानंतर अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होती पण त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर कोणतीही नवीन सुविधा देणारे कायदे निर्माण केले नाहीत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या हितासाठी नवीन तीन विधेयके आणली असून त्यातून कामगारांचे कल्याण होणार आहे. त्यांना न्याय मिळणार आहे. असे सांगत ना रामदास आठवले म्हणाले की,
मजुरोंको न्याय मिलेगा
तो देश गतीसे आगे चलेगा
कंपनी का मलिक हिलेगा
मजदूरोंको सही न्याय मिलेगा.
मजदूरोंके लाडले नेता है मा. नरेंद्र मोदी
इस लिये उन्होने छिनलि है काँग्रेस की सत्ता की गद्दी
गाव गाव की बोल रही है मजदूर दादी पंतप्रधान के रूप मे बहोत अच्छे है नरेंद्र मोदी.

नरेंद्र मोदीजीने लिया है अपने उपर सभी माजदूरों का भार
इस लिये देश के सभी मजदूर करते है मोदीजी पर प्यार
संतोष गंगवार जी है आदमी सोबर
इसलीये उन्हे मिला है डिपार्टमेंट लेबर
सभी लेबरको न्याय देने की गंगवार जी मै है हिम्मत
इसलीये हम सब मिलकर देते उनको किंमत

अशी कविता सादर करून सर्व सभागृह सदस्यांची मने रामदास आठवले यांनी जिंकली.