Balasaheb-Thorat

काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर माध्यमांसमोर मत व्यक्त केले आहे.

    मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस*Devendra Fadanvis) यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर माध्यमांसमोर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, फडणवीस यांना तुम्ही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

    त्याचे काय झाले?
    काही वर्षापूर्वी ते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही,असे म्हणाले होते. त्याचे काय झाले?, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण  दिले नाही तर संन्यास घेईन म्हणत आहेत, मात्र यापैकी काहीच झाले नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

    भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न
    थोरात पुढे म्हणाले की, सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमानसाला फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.