सावधान! आज पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार ; हवामान खात्याचा इशारा

येत्या ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर होती.

    मुंबई : हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात सावधानतेचा इशारा दिला आहे. येत्या तीन दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.रायगड, रत्नागिरी येथे पुढील २ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

     


    गेल्या २४ तासांत कोकणात मुसळधार, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली.महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

    नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना
    येत्या ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर होती. मुंबई महापालिकेने पाणीकपातीचे संकेत दिले होते. मात्र, दोन दिवस धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईत २ दिवसांत जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर दमदार पावसामुळे ७ तलावात पाण्याची भर पडली आहे. ७ तलावात दीड लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.