कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयच्या मित्राला अटक

मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन आरोपी समीर याने केले. दोघांनी मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. कोयत्याने केक कापून आरोपींनी हत्यार प्रदर्शन करत परिसरात दहशत पसरवली.

कोयत्याने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयच्या मित्राला अटकपिंपरी: कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणा-या बर्थडे बॉय आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बर्थडे बॉयच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता दापोडी गावात पीएमपीएमएल बस स्टॉप समोर घडली.

समीर सियाज बागसिराज (वय २०, रा. दापोडी), सोहेल शेख (रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी समीर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर आनंद जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपी सोहेल याचा वाढदिवस होता. मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन आरोपी समीर याने केले. दोघांनी मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. कोयत्याने केक कापून आरोपींनी हत्यार प्रदर्शन करत परिसरात दहशत पसरवली. यावरून बर्थडे बॉय सोहेल आणि त्याचा मित्र समीर या दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) (२७) ३५  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.