आरटीआयचा आधार घेत भाजपने केला गौप्यस्फोट – राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

भाजपाने(BJP) आरटीआय उत्तराचा हवाला देत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर (Thakre Government) हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनाही भाजपाने सवाल केला आहे.

    राज्यपालांकडे (Governor Quota)आमदार नियुक्तीसाठी १२ जणांची नावं पाठवलेली आहेत. मात्र राज्यपाल दिरंगाई करत असल्याचं टीका महाविकास आघाडीकडून केली जात होती. याच मुद्द्यावरून भाजपाने(BJP) आरटीआय उत्तराचा हवाला देत ठाकरे सरकारवर (Thakre Government) हल्ला चढवला आहे. राज्यपालांवर टीका करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनाही भाजपाने सवाल केला आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोट्यातून नियुक्त करण्याच्या १२ आमदारांच्या प्रस्तावावरून राज्य सरकारमधील मंत्री आणि तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांवर निशाणा साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राजभवनातून १२ जणांची नावं असलेली फाईल बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात मुख्यमंत्री सचिवालयाकडून एका आरटीआयला दिलेलं उत्तर जोडण्यात आलं आहे.

    हे पत्र ट्विट करत केशव उपाध्ये यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता-प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे, मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    “कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोलगे यांनी ही माहिती RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा… पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?,” असे प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.