नगरसेवक निधीतून कोविड-१९ उपाययोजनेसाठी १० लाख खर्च करण्याची भाजपची मागणी

मुंबई : भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी यापूर्वी नारसेवक निधीतून कोविड-१९ च्या निर्मूलनासाठी तसेच त्यासंबंधी उपाययोजनेसाठी २५ लाखाची मागणी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना दिले

मुंबई :  भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी यापूर्वी नारसेवक निधीतून कोविड-१९ च्या निर्मूलनासाठी तसेच त्यासंबंधी उपाययोजनेसाठी २५ लाखाची मागणी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना दिले होते. 

पण आयुक्तांनी त्या सुचनेची दाखल घेतली नाही.आता पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याच कामासाठी नगरसेवक निधीतून १० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी मिळावी. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठविले आहे.

मुंबई शहरामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवक निधीतून  10 लाख रुपये इतक्या रकमेचा खर्च  अनुज्ञेय आहे.  याबाबत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी सुचविल्या प्रमाणे “प्लस ऑक्सीमेंटर” आणि “इन्फ्रा रेड थर्मल गण” च्या माध्यमातून विभागातील प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांची चाचणी करणे आवश्यक आहे.या चाचणीसाठी आम्ही नगरसेवक अशासकीय संस्थाचे सहकार्य घेऊ, मेडिकल आणि पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या मदतीने घरोघर चाचणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर करू, असे आश्वासन देऊन १० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी द्यावी व तसे परिपत्रक जारी करावे.असेही प्रभाकर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.