राज्यात महिला अत्याचाराच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचे गणरायाला साकडे

सरकार याविषयी गंभीर नाही अद्याप पर्यंत महिला आयोगाला अध्यक्ष नाही तसेच आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शक्ती कायदा सुद्धा राज्यात अजून पर्यंत लागू करण्यात आलेला नाही त्यामुळे हे सरकार महिलांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी या सरकारचाही विसर्जन करावं असं साकडं भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वात इच्छापूर्ती गणेश मंदिरात करण्यात आला.

    राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने अमरावती येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोर साकडे आंदोलन करण्यात आले. महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून सरकारच्या दबावामुळे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करत नाही यामुळेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत चाललेली आहे.