बँक ऑफ महाराष्ट्रासह ३ बँकांच्या खासगीकरणाची ‘ब्लू प्रिंट’ तयार

बँकेचे विलगीकरण आणि खाजगीकरण करण्यासाठी नीती आयोगाने ब्लू प्रिंट तयार केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य तीन बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, यूको बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेचे खासगीकरण करावे असे म्हटले आहे.

बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. देशातील १२ पैकी केवळ चारच बँका सरकारी ठेवायच्या. इतर आठ सरकारी बँकांचे चारमध्ये विलीनीकरण किंवा खासगीकरण करायचे अशी योजना आहे.

बँकेचे विलगीकरण आणि खाजगीकरण करण्यासाठी नीती आयोगाने ब्लू प्रिंट तयार केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य तीन बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, यूको बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेचे खासगीकरण करावे असे म्हटले आहे.

मागील तीन वर्षात केंद्र सरकारने बँक विलीनीकरणअंतर्गत सरकारी बँकांची संख्या २७ वरून १२ केली आहे. जेवढी सरकारी बँकांची संख्या कमी तेवढे त्यावर सरकारला नियंत्रण ठेवणे सोपे अशी यामागची भूमिका आहे. या ब्लू प्रिंटला केंद्रीय मंत्रीमंडळाची आणि संसदेची मंजूरी लागणार आहे.